स्थैर्य, सातारा, दि. ८: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. ज्योतीराम गोविंदराव लाड फाउंडेशनच्या वतीने शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आलेला आहे. ज्या शेतकरी महिला स्वतः खंबीरपणे पुढे येऊन स्वतःसह आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी दिवस-रात्र कष्ट करीत असतात, अशा महिलांना सक्षम महिला सन्मान हा पुरस्कार स्व. ज्योतिराव गोविंदराव लाड फाउंडेशन च्या वतीने देण्यात आलेला आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. ज्योतीराम गोविंदराव लाड फाउंडेशनच्या वतीने सक्षम महिला सन्मान पुरस्कार हा परळी खोऱ्यातील शेतकरी महिलांना प्रदान करण्यात आला. यावेळी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे सातारा तालुका अध्यक्ष मिथिलेश मोहनराव लाड (आप्पा), ओमकार यादव, केदार कुलकर्णी, प्रतीक निपाणी, अनिकेत यादव, यश अरलूलकर, अरबाज सय्यद, प्रसाद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील पुरस्कार हे परळी खोऱ्यामध्ये काम करत असणाऱ्या शेतकरी महिला सौ. रेखा पांडुरंग देशमुख, सौ. सीमा चंद्रकांत पवार, सौ. संध्या चंद्रकांत पानसरे, सौ. स्मिता निलेश जाधव, सौ. ललिता मोहनराव यादव यांना प्रशस्तीपत्र व झाडाचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.