दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । सासकल येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित फलटण एज्युकेशन सोसायटी चे फलटण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकश्री. टी.एन शिंदे, सहशिक्षक, विद्यार्थी व सासकल गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य एस. डी निंबाळकर, प्रा.एन. एस ढालपे, प्रा.एन.ए पंडित, प्रा.एस. वाय लाळगे यांचे कृषीकन्या वैभवी ढमे, शिल्पा भिसे, दिप्ती भोईटे, मैथिली पोरे, अस्मिता सावंत, गौरी रणदिवे, आर्या शिंदे यांनी प्रत्येक माणसाच्या जीवनातील शिक्षण व राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षणाचे असणारे योगदान यावरती विचार व्यक्त केले. यावेळी शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. टी.एन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.