अस्थिर बाजारामुळे भारतीय निर्देशांकांत घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, ३ : वित्तीय शेअर्स गडगडले व अस्थिर बाजारामुळे भारतीय निर्देशांकांत घसरण दिसून आली. आयटी आणि एफएमीजी स्टॉक्सनीदेखील नुकसान झेलले. निफ्टी ०.०७% किंवा ७.५५ अंकांनी घसरला व ११.५२७.४५ अंकांवर स्थिरावला, मात्र निफ्टीने ११,५०० अंकांची पातळी कायम ठेवली. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.२४% किंवा ९५.०९ अंकांनी घटला व ३८,९९०.९४ अंकांवर विसावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की, आज जवळपास ११९९ शेअर्स घसरले, १४५२ शेअर्सनी नफा कमावला तर १७६ शेअर्स स्थिर राहिले. भारती इन्फ्राटेल (११.०९%), ग्रासीम इंडस्ट्रीज (७.०२%), टायटन कंपनी (५.५९%), युपीएल (४.४२%) आणि विप्रो (३.५४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती एअरटेल (१.९९%), आयसीआयसीआय बँक (२.०३%), हिंडाल्को इंडस्ट्रीज (२.१७%), अॅक्सिस बँक (१.६२%) आणि कोटक महिंद्रा बँक (१.६६%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी, ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी बँक १.२% नी घसरली, त्यासह निफ्टी मेटलही लाल रंगात दिसून आल्याने बाजार घसरला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप मात्र अनुक्रमे ०.४०% आणि ०.७४% नी वधारले.

व्होडाफोन आयडिया लि. : अॅमेझॉन आणि व्हेरीझॉन ४ अब्ज डॉलरपेक्षा जास्त निधी कंपनीच्या विविध प्लॅटफॉर्मवर करणार असल्याच्या बातम्या माध्यमांत आल्यानंतर व्होडाफोन आयडियाचे स्टॉक २९.८०% नी वधारले आणि त्यांनी १२.८५ रुपयांवर व्यापार केला. अॅमेझॉन आणि व्हेरीझॉन या रिटेलर्स आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीतील मोठ्या कंपन्या आहेत.

भारती एअरटेल लि. : भारती इन्फ्राटेल लिमिटेडला इंडस टॉवर मर्जरच्या बोर्डकडून करारास मंजूरी मिळाली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ११.०९% नी वधारले व त्यांनी २१७.८० रुपयांवर व्यापार केला.

युपीएल : ग्लोबल रिसर्च फर्मने युपीएलचे शेअर्स ६२० रुपये प्रति शेअर या लक्ष्यित किंमतीवर विकत घेण्याचा निर्णय कायम ठेवला. यानंतर कंपनीचे स्टॉक्स ४.४२% नी वधारले व त्यांनी ५२३.०० रुपयांवर व्यापार केला.

पेज इंडस्ट्रिज लि. : कंपनीने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ तोटा ३९.६ कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. तर कंपनीचा महसूलदेखील ६५.९% नी घटला व २८४.४ कोटी रुपयांवर आला. कंपनीचे स्टॉक्स २.७९% घसरले व त्यांनी १९,१४००.०० रुपयांवर व्यापार केला.

पॉवर मेक प्रोजेक्ट्स लि. : कंपनीला १,३११.७० कोटी रुपयांच्या कामाची ऑर्डर मिळाली. यासंबंधीचे लेटर ऑफ इंटेंट/एल१ पत्रही सूचना म्हणून मिळाले. कंपनीचे स्टॉक्स ४.८०% नी वाढले व त्यांनी ४५६.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरून ७३.४७ रुपयांवर आला. त्यामुळे सत्रातील ही सर्वात मोठी घसरण ठरली.

जागतिक बाजार : अमेरिका-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजाराने ठोसपणे व्यापार केला. युरोची विक्री करताना युरोपियन मध्यवर्ती बँकेसमोर चिंता होती, पण अमेरिकी डॉलरने आजच्या सत्रात नफा कमावला. आजच्या व्यापारी सत्रात, नॅसडॅकने ०.९८%, निक्केई २२५ ने ०.९४%, एफटीएसई १०० ने ०.८५% आणि एफटीएसई एमआयबीने १.०० ची वृद्धी घेतली तर हँगसेंगने ०.४५% ची घसरण अनुभवली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!