दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२३ । मुंबई । पोर्तुगीज बहुल गोवा राज्य भारत प्रजासत्ताक देशात सामील करण्यासाठी झालेल्या गोवा मुक्ती संग्राम ज्यांच्या नेतृत्वाखाली झाला ते आर्मी बटालियन चीफ दिवंगत मेजर बाबुराव जी. जाधव (मढाळकर) यांच्या सुविद्य पत्नी तसेच आंबेडकरी चळवळीतील जुन्याजाणत्या कार्यकर्त्या चंद्राबाई बाबुराव जाधव यांच वयाच्या ९१व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
दिवंगत चंद्राबाई जाधव या सोज्वळ, मनमिळाऊ, सर्वसमावेशक, कणवाळू, आदरणीय व्यक्तीमत्व व आदर्श माता म्हणून समाजात प्रसिद्ध होत्या, बी. जी. जाधव यांची जन्मभूमी, कर्मभूमी हे मुंढर गाव असून जन्म, लहानपण, तारुण्य, वैवाहिक जीवन, वृद्धापकाळ अस आयुष्यातील ८०% जीवन त्यांनी मुंढर या गावी व्यतीत केले. सेना निवृत्तीनंतर त्यांनी मंत्रालयात नोकरी केली व मंत्रालयातून निवृत्त झाल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते आपल्या मुळगावी मढाळ येथे स्थायिक झाले तिथे ही त्यानी आपल्या भावकीचा कारभार हातात घेऊन तिथे ही आपला ठसा उमटवला तसेच बौद्धजन सहकारी संघ, मौजे मुंढर शाखा क्र. २४ या शाखेचे माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे योगदान दिले. चंद्राबाई जाधव यांनी आपल्या मुलीला योग्य शिक्षण दिल्यानेच गुहागर तालुक्यातील पहिली महिला पदवीधर म्हणून त्यांची मुलगी इंदू जाधव उर्फ जोत्स्ना पवार (कालुस्तेकर) हिने नावलौकिक मिळवला आहे, गोवा मुक्ती संग्रामात प्रचंड चकमक व गोळीबार सुरू असताना ही आपल्या लहान मुलीला घेऊन आपल्या पतीसोबत मिलिटरी कॅम्पात राहून त्यानी गोवा मुक्ती संग्राम स्वतःच्या डोळ्यांदेखत बघितला होता. त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यामागे मुलगी ज्योत्स्ना पवार, नातू कुणाल पवार, नातसून, नातवंडे व पुतण्या अनंत जाधव आणि इतर सुना नातवंडे असा परिवार आहे.
दिवंगत चंद्राबाई जाधव यांच्या अंतयात्रेतला समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला होता, त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेच्या कार्यक्रम दि. २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता शाखा क्र. ५८९ चे अध्यक्ष गोपाळ हरिश्चंद्र लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नालासोपारा येथे आयोजित करण्यात आला आहे, सदर कार्यक्रमास शाखा क्र. २४ मौजे गाव मुंढर व शाखा क्र. ३६ मौजे मढाळ व कालुस्तेकर भावकी यांचे मान्यवर कार्यकर्ते सदर कार्यक्रमास उपस्थितीत राहणार आहेत, तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून दिवंगत चंद्राबाई जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आव्हाहन शाखा क्र. ५८९ चे जेष्ठ सभासद मा. कुणाल पवार यांनी शाखेच्या व पवार परिवाराच्या वतीने आवाहन केले आहे.