दैनिक स्थैर्य | दि. २५ मार्च २०२४ | फलटण |
राज्य परिवहन फलटण आगार आणि शिवदत्त आय क्लिनिक फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण आगारातील चालक – वाहक, कार्यशाळा कर्मचारी यांच्याकरिता नेत्र तपासणी शिबिर श्री दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते.
शिवदत्त आय क्लिनिकचे डॉ. अनिल कुमार माने व त्यांचे सहकारी यांनी चालक वाहक व कर्मचारी यांची मोफत नेत्र तपासणी केली व आवश्यकतेनुसार मोफत आय ड्रॉपचे वितरण करण्यात आले. या तपासणी शिबिराचा फलटण आगारातील शंभर कर्मचार्यांनी लाभ घेतला.
या शिबिरात आपल्या डोळ्यांची निगा राखण्याबद्दल डॉ. माने यांनी कर्मचारी बंधूंना मार्गदर्शन केले. नेत्र तपासणी शिबिर आयोजनाबद्दल कर्मचारी बंधू-भगिनी यांनी धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी स्थानकप्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, वाहतूक निरीक्षक रवींद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज आहिवळे उपस्थित होते.