अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात : 7 मोटारसायकली जप्त
स्थैर्य, सातारा, दि. 17 : सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाने मेढा, वाई व सातारा व खंडाळा तालुक्यात महागड्या मोटारसायकली चोरणार्या टोळीतील 5 जणांना जेरबंद केले आहे. यापैकी एक अल्पवयीन मुलगा आहे तर ज्ञानेश्वर विजय जाधव, सुरज संजय साबळे, प्रशांत रविंद्र बावर तिघे रा. उडतरे, ता. सातारा व प्रज्योत विवेक भागवत रा. वावधन, ता. वाई अशी उर्वरित चौघांची नावे आहेत. या टोळीकडून 7 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती अशी, मेढा, वाई व सातारा तालुक्यात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने तालुका पोलिसांना गुन्हेगारांना अटक करण्याच्या सुचना मिळाल्या होत्या. त्यानुसार चोरट्यांचा शोध सुरू होता. यावेळी तालुका पोलिसांच्या डी.बी. पथकाने चोरट्यांवर पाळत ठेवून एकास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ चौकशी केली असता त्याने उर्वरित चार साथीदारांची नावे असून सर्वांनी मेढा, वाई, खंडाळा, सातारा तालुका, सातारा शहरात यामाहा कंपनीचे आर-15 च्या दोन महागडया मोटारसायकल, 3 बजाज पल्सर 220, दोन स्पेंन्डर मोटारसायकल (खोलून ठेवलेल्या) चोरून नेल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्व पाचजणांना ताब्यात घेत 7 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सजन हंकारे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व डी.बी. पथकातील हवालदार डी. बी. बर्गे, दादा परिहार, पो. ना. सुजीत भोसले, उत्तम पवार, सागर निकम, संदीप कुंभार, नितीराज थोरात व स्थागुशाकडील हवालदार विनोद गायकवाड, सुधीर बनकर, संतोष जाधव, गणेश कापरे, धीरज महाडिक, वैभव सावंत, संजय जाधव यांनी केलेली आहे.