प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
स्थैर्य, फलटण दि.१७ : नांदेड जिल्ह्यातील बिळोली येथील मातंग समाजातील मुकबधीर मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करणार्यांवर कठोर कारवाई करुन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचेवतीने फलटण प्रांताधिकार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर वारंवार अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असून अशा नराधमांवर जलद न्यायालयात ताबडतोब कारवाई करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदन देताना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव विजय येवले, तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, जिल्हा सरचिटणीस मुन्ना शेख, जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, तालुका उपाध्यक्ष सतिश अहिवळे, शहर अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.