दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील गुणवरे येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कुलमध्ये आषाढी एकादशी निमित्त आषाढी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
आयोजित आषाढी दिंडी सोहळ्यामध्ये अभंग, भक्तीगीतावर आधारित नृत्य, वृक्ष दिंडी व आषाढी एकादशी निमित्त नाटक असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
सदर कार्यक्रमास मुधोजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रवींद्र येवले, आंदरूड विकास सोसाटीचे चेअरमन शंभूराज विनायकराव पाटील, सुभेदार डूग्गल, संस्थेचे सचिव विशाल पवार, खशाभा जाधव, आप्पासाहेब वाघमोडे, रामराव खाडे, ऋषिकेश गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रियांका पवार, प्रशालेचे पर्यवेक्षक किरण भोसले, समन्वयक सौ. सुप्रिया सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी दिंडी सोहळा संपन्न झाला.
प्रशालेच्या शिक्षिका सौ. मंजिरी अब्दागिरे व सौ. सुप्रिया सपकाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेतील सर्व मुला – मुलींनी आणि शिक्षकांनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.