
दैनिक स्थैर्य । 23 जुलै 2025 । फलटण । येथील डीएड चौक या मध्यवती ठिकाणी एका बांयकामारोवारी पोट्यापासून गुटलेला मानवी पाय आदळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी केले आहे
फलटणमध्ये रिंग रोडजवळ असलेल्या डीएड चौकात एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीलगत घोट्यापासून तुटलेला पाय आढळला, याबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. अथवा माहिती मिळालेली नाही. या पायाचे गुढ कायम आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एखादा अपघात होऊन, कामगाराचा पाय तुटला आहे का ? रिंग रोड परिसरात अनेक रुग्णालये असून, एखाद्या रुग्णालयात एखाया व्यक्तीचा पाय काढून टाकण्यात आला आहे का? असल्यास तो रुग्णालयातून तिथे कसा गेला? इतर ठिकाणाहून त्या इमारतीजवळ हा पाय कोणी टाकला आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत पोलिसांनी इमारतीच्या परिसरात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीही माहिती मिळाली नाही.