दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२४ | फलटण |
ओमान देशात मस्कत शहरात झालेल्या हॉकी वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेमध्ये वाखरी, ता. फलटण, जि. सातारा गावच्या सुवर्णकन्या कु. अक्षता आबासाहेब ढेकळे-पाटील यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय हॉकी महिला संघाने भारत देशाला वर्ल्ड कप २०२४ मध्ये ऐतिहासिक सिल्व्हर मेडल (रजत पदक) मिळवून दिले.
या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने पोलंड, अमेरिका, नामेबिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघाना हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी गेल्या वर्षी अक्षताच्या प्रतिनिधींत्वामध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
या घवघवीत यशाबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे आणि अक्षताचे अभिनंदन होत आहे.