
दैनिक स्थैर्य । 15 एप्रिल 2025। फलटण । वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथील वाठार हायस्कूलमध्ये 2006-2007 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला.
कार्यक्रमास जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्रीभैय्या कदम, सरपंच सौ. सुवर्णताई नाळे, मुख्याध्यापक श्रीमंत घोरपडे, शिवाजी शिंदे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
ज्या काळात शिक्षण घेतलते ते शिक्षक तसेच वर्गशिक्षक शारदादेवी कदम यांनी मार्गदर्शन केले. जुन्या आठवणीना उजाळा देण्यात आला. 19 वर्षापूर्वीची परिस्थिती व आताच्या प्रौढ स्थितीतील परिस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक वेगळे रूप आले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्काराने घडलेली ही पिढी एका विचाराने एकत्र आली. कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
या गेट-टुगेदरच्या कार्यक्रमासाठी सर्वांना एकत्रित आणण्याचे सागर मोहिते, निलेश निंबाळकर, सागर घोलप, अनिल जगताप, अमोल माने, अविनाश ननावरे, किशोरी पवार, प्रकाश म्हेत्रे, तोसिफ शेख, स्वप्नाली निंबाळकर, अनुजा मुळीक, स्वप्नील मुळीक, गणेश धायगुडे यांनी केले.
या गेट-टुगेदर च्या कार्यक्रमामुळे मित्र मैत्रिणी कोणत्या पदावर काम करत आहेत हे अवगत झाले. माजी विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक श्रीमंत घोरपडे, शिवाजी शिंदे, श्री. जाधव, सौ. मोटे, श्री. सोनवलकर,श्री.हंबीरराव मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थीकडून शाळेला हसत खेळत विज्ञान तसेच एआई टेक्नॉलॉजीद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्हर्टिकल सेक्शन ठेवला. तसेच शाळेला भेट वस्तु दिली. कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. निलेश निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. स्वप्नाली निंबाळकर यांनी आभार मानले. यावेळी भोजनाचा आस्वाद सर्वांनी मिळून घेतला.