
दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२२ । मुंबई । ईव्हीयम ह्या नवीन ईव्ही दुचाकी ब्रँडने भारतामध्ये आपल्या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या शुभारंभाची घोषणा केली आहे- कॉस्मो, सीझार, आणि कॉमेट. तीनही ई- स्कूटर्स ह्या हाय स्पीड प्रकारामध्ये सुरू केल्या गेल्या आहेत. युनायटेड अरब आमिरातीमधील कंपनी मेटा४ ग्रूपची ऑटो शखा असलेल्या इसिलियम ऑटोमोटीव्हजने भारतामध्ये अलीकडेच आपल्या ईव्ही दुचाकी ब्रँड ईव्हीयमच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. ह्या स्कूटरची किंमत रू. १.४४ लाख – २.१६ लाख अशी आहे.
सर्व स्कूटर्समध्ये अनेक स्पीड असलेले मोडस (इको, नॉर्मल आणि स्पोर्ट), कीलेस स्टार्ट, अँटी थेफ्ट फीचर, अद्ययावत एलसीडी डिस्प्ले, रिजनरेटीव्ह ब्रेकिंग, मोबाईल एप कनेक्टिव्हिटी, फाइंड माय व्हेईकल फीचर, रिअल टाईम ट्रॅकिंग, ओव्हर स्पीड अलर्ट, जिओफेन्सिंग इ. चा समावेश आहे. कॉमेट आणि सीझारमध्ये रिव्हर्स गेअरचे अतिरिक्त फीचर आहे व त्यामुळे राईड हा पूर्णपणे अतिशय उच्च तंत्रज्ञान आधारित अनुभव बनतो.
ईव्हीयमचे पार्टनर आणि प्रमोटर श्री. मुजम्मील रियाज़ यांनी सांगितले की, “आम्हांला अतिशय आनंद आहे की, ईव्हीयम ब्रँडचा भारतीय मार्केटमध्ये शुभारंभ झाल्यानंतर अगदी थोड्या वेळामध्ये आम्ही ब्रँडच्या तीन नवीन उत्पादनांचा शुभारंभ करू शकलो. सध्या भारतीय ईव्ही उद्योगामध्ये अशा कटिबद्धता असलेल्या कंपनीची गरज आहे जी गुणवत्तापूर्ण उत्पादनांसह मार्केटला बळकट करेल व त्याद्वारे ते टिकेल आणि त्यासह त्याची वाढसुद्धा होईल. आम्हांला खात्री आहे की, ह्या उत्पादनांना मार्केटमधून उत्तम प्रतिसाद मिळेल आणि आम्ही ई- मोबिलिटीच्या अधिक व्यापक व्हिजनच्या दिशेने योगदान देऊ.”
कॉस्मो: ब्रँडने सुरू केलेल्या नवीन कॉस्मोमध्ये सहजपणे ६५ किमी/ तास असा वेग मिळेल. त्याच्या अंतराच्या संदर्भात, एका वेळी पूर्ण चार्ज केल्यानंतर रायडर ८० किमी पेक्षा जास्त अंतर पार करू शकतो. ह्या ई- स्कूटरला लिथियम- आयन ७२व्ही आणि ३०एएच बॅटरीद्वारे ऊर्जा मिळते व ती पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. कॉस्मोमध्ये २००० व्हॉट्स मोटर येते. ब्रँड ही ई-स्कूटर अनेक आकर्षक रंगांमध्ये देत आहे- गडद काळा, चेरी रेड, लिंबूसारखा पिवळा, पांढरा, निळा आणि करडा. कॉस्मोची एक्स शोरूम किंमत १.४४ लाख रुपये आहे.
कॉमेट: ब्रँडने उपलब्ध केलेली कॉमेट ही ईव्ही ८५किमी/ तास इतक्या सर्वोच्च वेगासह मिळते. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर ती १५० किमीपर्यंत जाऊ शकते. ह्या राईडला लिथियम- आयन ७२व्ही आणि ५०एएच बॅटरीने ऊर्जा दिली आहे व ती पूर्ण चार्ज व्हायला फक्त ४ तास लागतात. कॉमेटमध्ये अशी मोटर आहे जिची पॉवर ३००० व्हॉट्स आहे. ही ई स्कूटर अनेक रंगांमध्ये मिळते- शायनी ब्लॅक, मॅट ब्लॅक, वाईन रेड, रॉयल ब्ल्यू, बेज आणि पांढरा. कॉमेटची एक्स शोरूम किंमत १.९२ लाख रुपये आहे.
सीझार: ह्या ब्रँडची तिसरी स्कूटर सीझार हीसुद्धा एक उच्च गती असलेली व्हेरिएंट आहे व तिची अधिकतम गती ८५ किमी/ तास आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर ती सहजपणे १५० किमी अंतर जाऊ शकते. लिथियम- आयन ७२व्ही आणि ४२एएच बॅटरीने सज्ज असलेला हा व्हेरिएंटही अगदी लवकर म्हणजे ४ तासांमध्ये पूर्ण चार्ज होतो व अशा प्रकारे ही ह्या उद्योगामधील सर्वोत्तम आहे. ह्या ३ स्कूटर्सपैकी, सीझारमध्ये सर्वाधिक शक्तीशाली मोटर आहे व तिची क्षमता ४०००व्हॉट्स आहे. हा व्हेरिएंट अनेक आकर्षक रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे व त्यात ग्लॉसी ब्लॅक, मॅट ब्लॅक, ग्लॉसी रेड, लाईट ब्ल्यू, मिंट ग्रीन व पांढरा ह्यांचा समावेश आहे. सीझारची एक्स शोरूम किंमत २.१६ लाख रुपये आहे.