शहरात जिकडे पहावे तिकडे जलवाहिन्याना गळत्याच गळत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 09 : शहरातल्या अर्ध्या भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर अर्ध्या भागाला सातारा पालिका पाणी पुरवठा विभाग पाणी पुरवठा करते.मात्र, शहरात जिकडे पहावे तिकडे जलवाहिन्याना गळत्याच गळत्या लागलेल्या दिसत आहेत.मग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल की पालिकेचा पाणी पुरवठा विभाग असेल.या गळत्या काढून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन टोकडे होत असल्याचे दिसते आहे.पावसाळ्यापूर्वी कामे झाली नाहीत तर पाणी टंचाई उदभवण्याची शक्यता आहे.

सातारा शहरात यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली असली तरीही लॉक डाऊन असल्याने नागरीकांनी बोलायचे तरी कोणाला?,आपल्या प्रभागातील नगरसेवकांना फक्त पाणी टंचाईची खंत व्यक्त केली.लॉक डाऊनच्या काळात शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्याला गळत्या लागल्या.जीवन प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत येणाया भागातली तब्बल दोन वेळा पाईप लाईन तुटली गेली होती.त्यामुळे सदरबझार, गोडोली या परिसरात टंचाई निर्माण झाली होती.आता पालिकेच्या अखत्यारीत येणाया तोफखाना परिसर,दत्तमंदिर, नगरपालिका मुख्यालय,शाहू चौक, मानस हॉटेल येथे गेल्या कित्येक दिवसापासून गळती लागली आहे. ही गळती काढण्याकरिता पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.लक्ष घालून गळती काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!