दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । बारामती । भारत फोर्ज परिवारातील प्रत्येक कर्मचारी हा कंपनीचा आत्मा आहे असे प्रतिपादन भारत फोर्ज चे चेअरमन बाबासाहेब कल्याणी यांनी केले. ३१ मार्च २०२२ रोजी पद्मभूषण श्री. बाबासाहेब कल्याणी यांनी भारत फोर्ज उद्योगातील कार्याची व कर्तृत्वाची ५० वर्ष पूर्ण झाली.त्यानिमित्त शुक्रवार 06 मे रोजी बारामती एमआयडीसी मधील भारत फोर्ज कामगार संघटना बारामती तर्फे सन्मान करण्यात आला, या प्रसंगी बाबासाहेब कल्याणी बोलत होते.
या प्रसंगी बारामती चे प्लांट हेड सुशांत पुस्तके,कर्मचारी संघटना अध्यक्ष राहुल बाबर, सरचिटणीस आनंद भापकर,सदस्य संदीप मोरे,गोपाल कृष्ण राऊत आदी मान्यवर व कर्मचारी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्तीत होते. भारत फोर्ज च्या यशात प्रत्येक कामगारांचा मोठा वाटा आहे उद्योग क्षेत्रातील वैभवशाली परंपरा या पुढेही कामगार अविरत चालू ठेवतील असा विश्वास कल्याणी यांनी दिला.
संपूर्ण भारत फोर्ज परिवारात जवळपास २५ हजार कर्मचारी अधिकारी कार्यरत असून बाबासाहेब यांच्या कणखर नेतृत्व व दूरदृष्टी मुळे प्रगती झालेली असून परिवारातील सर्व जण सुखी व समृद्ध जीवन जगत आहेत या बदल कर्मचारी संघटना चे अध्यक्ष राहुल बाबर यांनी सर्व कर्मचारी यांच्या वतीने धन्यवाद देऊन सन्मान केला. आभार सरचिटणीस आनंद भापकर यांनी मानले