राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त सहकार ,पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी १०० सेकंद स्तब्ध उभे राहुन केले अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । सातारा । राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दी निमित्त राज्याचे सहकार ,पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर १०० सेकंद स्तब्ध उभे राहुन अभिवादन केले.

याप्रसंगी शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, समाजातील सर्व घटकांना दिशा देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करून जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच समाजकारण आणि प्रशासन यांच्या सर्वांगीण विकासाने पुरोगामी महाराष्ट्राचा पाया त्यांनी रचला.

आज ६ मे, छत्रपती शाहू महाराजांचा स्मृतिदिन. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आज त्यांच्या स्मृति शताब्दीदिन ठीक सकाळी १०.०० वाजता शाहू चौक, कराड येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ १०० सेकंद स्तब्धता पाळून जिल्ह्याच्यावतीने अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!