काेराेनातही कंपन्यांनी जमवला सर्वाधिक निधी; आरोग्य, डिजिटल कंपन्यांत गुंतवणुकीसाठी स्पर्धा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१४: मार्च २०२० जगभरातील
कंपन्यांसाठी भीतिदायक राहिला. या काळात कोरोना पूर्ण जगात पाय पसरवत होता.
कंपन्यांना त्यांच्या भविष्याबाबत काळजी होती. भविष्यातील निधी संकटाची
भीती होती. मात्र, या विपरीत आता जे अहवाल येत आहेत त्यातून दिसते की, २०२०
मध्ये जगभरातील कंपन्यांनी जेवढा निधी जमवला आहे तेवढा आजपर्यंत एका
वर्षात जमवला नव्हता. आर्थिक माहिती देणारी ग्लोबल फर्म रिफिनिटिव्हच्या
अहवालानुसार यंदा बिगरवित्तीय कंपन्यांनी सार्वजनिक गुंतवणूकदारांकडून ३.६
ट्रिलियन डॉलर जमवले आहेत. एवढेच नव्हे तर २.४ ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट
ग्रेड व ४२६ अब्ज डॉलरचे रिस्की जंक बाँड आले.

आयपीओसाठीही
हे वर्ष चांगले होते. गेल्या २ डिसेंबरला हाँगकाँगमध्ये चिनी ऑनलाइन
फार्मसी कंपनी जेडी हेल्थने आयपीओतून ३.५ अब्ज डॉलर जमवले. हाँगकाँगमध्ये
हा या वर्षातील मोठा आयपीओ राहिला. अमेरिकी फूड डिलिव्हरी कंपनी डोरडॅश व
होम रेंटल प्लॅटफॉर्म एअर बीएनबीनेदेखील न्यूयॉर्कमध्ये असाच आयपीओ आणला.
इन्व्हेस्टमेंट बँक जेपी मॉर्गन चेजचे कार्लोस हर्नैंडेज सांगतात, निधी
जमवण्यात अमेरिकेच्या कार्निव्हल क्रूझ लाइनने आश्चर्याचा धक्का दिला.
त्यांनी कर्ज व शेअर विकून एप्रिल महिन्यात ६.२५ अब्ज डॉलर जमवले. विशेष
म्हणजे या काळात जहाज व क्रूझ उभी होती व या कंपन्यांना खूप नुकसान सहन
करावे लागले. असाच बोइंगलाही फायदा झाला.

यंदा पुन्हा शेअर बायबॅकचा ट्रेंड

जगभरात
शेअर बायबॅकचा ट्रेंड यावर्षी पुन्हा आला आहे. लिस्टेड कंपन्यांनी यंदा
५३८ अब्ज डॉलर सेकंडरी स्टॉक सेलमधून जमवले, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत ७०
टक्के जास्त आहेत. यंदा डिजिटल, क्लाऊड आणि आरोग्यसारख्या क्षेत्रात काम
करणाऱ्या कंपन्यांच्या आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळाला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!