स्थैर्य, मुंबई, दि. 27 : लॉकडाऊनमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद असल्या तरी त्यांच्या इमारती सुस्थितीत रहाव्यात यासाठी पावसाळयापूर्वी दुरूस्ती करावी. दुरूस्तीचे काम मोठे असेल तर परवानगी आवश्यक आहे. अशा सुचना माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.
मे महिन्याच्या अखेर चाकरमानी आपल्या घरी परतात. तर जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात शालेय साहित्य खरेदीची लगबग दिसून येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कधी मागे घेतला जाणार आणि शाळा कधी सुरू होणार, यांची उत्सुकता पालक व विद्यार्थ्यांना आहे. दरम्यान, शाळा व महाविद्यालयांच्या इमारतींच्या दुरूस्तीबाबत क्षीरसागर यांनी शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सुर ळांचा परिसर, मैदानांमध्ये पावसाचे पाणी साचू नये यासाठी उपाययोजना कराव्यात, कार्यालयातील कागदपत्रे, विद्यार्थ्यांशी संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवण्याची दक्षता घ्यावी अशा सुचना केल्या आहेत.