माणिकराव गेल्याने दुधेबावी गावात सुद्धा काहीच फरक पडणार नाही; राजे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 13 ऑगस्ट 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी नुकताच पक्ष बदलला आहे. तरी माणिकराव सोनवलकर गेल्याने फलटण तालुक्यात नव्हे तर दुधेबावी गावात सुद्धा काहीच फरक पडणार नसल्याचे मत राजे गटाचे कार्यकर्ते करीत आहेत.

आज विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “लक्ष्मी – विलास पॅलेस” निवासस्थानी कोळकी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. त्यावेळी विविध कार्यकर्ते बोलत होते.

यावेळी कोळकी जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर हे गेल्याने गावामध्ये सुद्धा काहीच फरक पडणार नाही. सर्वसामान्य जनता ही राजे गटाच्या सोबतच असल्याचे मत यावेळी विविध कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

जर गावांसाठी कोणता निधी आणायचा असेल तर माणिकराव सोनवलकर हे श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या पर्यंत भेटू देत नव्हते त्यामुळे अनेकांची कामे कायमच रखडत होती. यामुळे तुमच्या पर्यंत आम्हाला येत नव्हते. आता आगामी काळात सर्वसामान्य कार्यकर्ते यांना श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे यांनी थेट संपर्क ठेवत आम्हाला पाठबळ द्यावे; असे मत यावेळी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!