सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेत आर.डी. पाटील साहेबांचे मोलाचे योगदान – ना .श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 21 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष स्व .रघुनाथराव दौलतराव पाटील उर्फ आर. डी. पाटील यांची पुण्यतिथी शुक्रवारी बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सातारा  येथे संपन्न झाली.

यावेळी बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सभापती ना .श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, सातारा जिल्हयाचे सर्वांगीण विकासासाठी, जिल्हयातील प्रत्येक तळागाळातील घटकांचा, सहकारी संस्थांचा, सहकार चळवळीचा तसेच औद्योगिक प्रगती होणेसाठी तसेच  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेत आर. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या  निस्वार्थी आणि निष्कलंक शिलेदाराच्या उल्लेखाशिवाय सहकाराचा इतिहास अपूर्ण आहे.

बँकेचे संचालक व सहकार पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील म्हणाले,  जिल्ह्यातील कल्याणकारी योजनांच्या उन्नतीसाठी आर. डी. पाटील यांनी निर्णायक सहाय्य केले. त्यांनी केलेल्या निष्काम सेवेबद्दल सबंध सातारा जिल्हा ऋणी आहे.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले स्व .रघुनाथराव पाटील यांचे सातारा जिल्हा बॅंकेच्या उभारणी आणि प्रगतीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे .त्यांचे कार्य सहकार क्षेत्रांमध्ये कार्य  करणा-या सर्वांना प्रेरणादायी असून सहकारी बॅंकिग क्षेत्रात त्यांचे काम दीपस्तंभा सारखे आहे.

बॅंकेचे उपाध्यक्ष सुनिल माने म्हणाले, स्व .रघुनाथराव पाटील यांचे व्यक्तीमत्व निस्वार्थी आणि निष्कलंक होते. सन १९४७-४८  मध्ये कराड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे सतत १७ वर्षे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष व संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ लि .पुणे अध्यक्ष, कोयना सह. दूध प्रकल्पांचे अध्यक्षपद अशी रघुनाथराव पाटील यांची यशस्वी कारकीर्द आहे.

या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले या बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील, आबासाहेब वीर इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभलेमुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्हयामध्ये ३२० शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या सेवा देत आहे. चालू वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील गरजू कुटुंबाना उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे कीटसाठी रक्कम रु. १ कोटी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसही रक्कम रु. १ कोटीची मदत केली असून या व्यतिरिक्त बँकेने संचालक मंडळ सदस्यांचा सभाभत्ता व बँक अधिकारी/सेवक यांचे १ दिवसाचे वेतन रक्कम रु .१६  लाखाची मदत मा .मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करणेत आली.

या प्रसंगी बँकेचे संचालक आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, नितीन पाटील, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, अर्जुनराव खाडे, तसेच बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध  विभागांचे व्यवस्थापक,  उपव्यवस्थापक, विभागप्रमुख, अधिकारी व सेवक यांनी स्व .रघुनाथराव दौलतराव पाटील यांचे प्रतिमेस फुले वाहून विनम्र अभिवादन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!