
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.9 : पावसाळ्यात येणाऱ्या पूर परिस्थिती व अशा प्रकारच्या सर्व नैसर्गीक आपत्तीस समर्थपणे तोंड देण्यासाठी तसेच शासन, अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग यांना अधिकृत माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता कृष्णा सिंचन विभागात पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या कक्षाचे कक्ष अधिकारी म्हणून व्ही.टी. मोटे, उप कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग कृष्णानगर, सातारा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02162-244481 तर मो. क्र. 9420050800 असा आहे.
