स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर कृती समिती स्थापन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । सातारा । भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “हर घर तिरंगा”  व  दि. 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव  आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचयात स्तरावर कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.

हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव या उपक्रमांच्या नियोजन, प्रचार, प्रसिध्दी तसेच नागरिकांना प्रोत्साहित व प्रेरित करणे  यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये खालीलप्रमाणे कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.

सरपंच-अध्यक्ष, उपसरपंच-उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सर्व सदस्य- सदस्य, तलाठी, कोतवाल, कृषी सेवक -सहाय्यक,  पोलीस पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक (प्राथ.), प्राचार्य, शिक्षक (माध्य.), अंगणवाडी सेविका, आशा सेविका, केंद्र चालक (ASSK) हे सदस्य असतील तर ग्रामसेवक हे सदस्य सचिव असतील.


Back to top button
Don`t copy text!