दैनिक स्थैर्य | दि. २ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडी येथे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथे उद्यानकन्यांद्वारे निबंध स्पर्धा व क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण, ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडी येथे गुरुवार, दि. २५ जानेवारी २०२४ रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा व क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये कबड्डी आणि १०० मी. धावणे यांचा समावेश होता. या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. तांबे सर व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील सर आणि प्रा. जे. व्ही. लेंभे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या स्नेहल निकम, प्रज्ञा देशमुख, नम्रता ढोपरे, वैभवी रणवरे, गायत्री शेडगे, अस्मिता शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.