ईश्वरी ब्युटी पार्लर अल्पावधीतच नावारूपास येईल : श्रीमंत सुभद्राराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । फलटण । फलटणमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या ईश्वरी ब्युटी पार्लर हे अल्पावधीतच नावारूपास येईल, असे प्रतिपादन श्री सद्गुरु प. पु. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे निंबाळकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

फलटण येथे असणाऱ्या रिंग रोड येथील दुर्गा कॅफे नजीक ईश्वरी ब्युटी पार्लरचे उद्घाटन श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी फलटण नगर परिषदेच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सौ. नीता मिलिंद नवसे, कोळकीच्या सरपंच सौ. स्वप्ना अनिल कोरडे, वाठार निंबाळकरच्या नवनियुक्त लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णानंद कुमार नाळे, नेत्रा आय क्लिनिकच्या डॉ. सौ. स्वप्ना मुकुंदराज जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

पुणे येथे नामांकित संस्थेमध्ये मेकअप आर्टिस्ट चा कोर्स पूर्ण करून फलटण सारख्या ठिकाणी ईश्वरी ब्युटी पार्लर हे सुरू करून फलटणकर मुली व महिलांसाठी एक विशेष दालन नक्कीच फलटणकरांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही, असेही यावेळी श्रीमंत सुभद्राराजे यांनी स्पष्ट केले.

फलटण येथे सुरू करण्यात आलेल्या ईश्वरी ब्युटी पार्लरमध्ये स्किन व हेअरच्या संबंधित सर्व अशा ट्रीटमेंट माफक दरामध्ये करण्यात येणार आहेत. हे सुरू झालेलं दालनाचा फलटणकर महिलांना नक्कीच फायदा होणार आहे, असे मत फलटणच्या माजी नगराध्यक्ष सौ. नीता मिलिंद नवसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

डॉ. सौ. जाधव, सौ. स्वप्न कोरडे, सौ. मंदाकिनी जगदाळे, सौ. अनिता घनवट, सौ. नयना जाधव, सौ. आशा भुजबळ,सौ. तेजू रासकर, सौ. गौरी लोंढे, सौ. भावना भोईटे, सौ. कविता जगताप, सौ.सारिका बनकर, सौ. प्रिया बनकर, सौ. माधुरी सोनाली काळुखे, सौ‌. हर्षदा कोकरे, सौ. उर्मिला भोंगळे, सौ. राजू भिसे, सौ. वैशाली फडतरे, सौ. अपर्णा टाकसाळकर, सौ. आम्रपाली कोकरे, सौ. नुपूर शहा, सौ. आशा कोरडे, सौ शुभदा गारुळे, सौ. राणी कर्णे, सौ दिपाली भिसे, सौ.प्राजक्ता भिसे, सौ. शोभा राऊत, सौ. शिवानी आडकर, सौ. शिवांजली शिंदे, सौ. पुजा कोकरे, सौ. प्राची पखाले, सौ. हर्षदा शिंदे, सौ. सुप्रिया भुजबळ, सौ. सुरेखा भुजबळ, सौ. स्वाती चांगण, सौ. पुजा भिसे, सौ. सरख प्रियंका इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी फलटण पंचक्रोशीतील शेकडो महिलांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!