पीएफ बलंन्स आणि माहितीसाठी ईपीएफओची व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू; सभासदांना मोठा दिलासा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी असून, ईपीएफओने शिल्लक रक्कम आणि खात्यातील अद्यतनांसाठी व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू केली आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १८ ऑक्टोबर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी एक अत्यंत उपयुक्त पाऊल उचलले असून, आता घरबसल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पीएफ खात्याची माहिती मिळवणे शक्य झाले आहे. या नवीन सुविधेमुळे पीएफ सभासदांना कार्यालयात जाण्याची किंवा ऑनलाइन पोर्टलवर वारंवार लॉगिन करण्याची कटकट सुटली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप सेवेचे फायदे आणि वैशिष्ट्ये

या सुविधेच्या माध्यमातून सभासदांना त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम (बॅलन्स), योगदानाची माहिती आणि इतर अद्यतन थेट त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. ईपीएफओच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संदेश पाठवून ही माहिती काही सेकंदात मिळवता येईल. यामुळे कोट्यवधी कामगार आणि कर्मचाऱ्यांचा वेळ बचवण्यास मदत होणार असून डिजिटल सेवा अधिक सुलभ झाली आहे.

तांत्रिक सहाय्य आणि वापर करण्याची प्रक्रिया

डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली असून, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून संबंधित क्रमांकावर संपर्क साधून सभासदांना या सुविधेचा लाभ घेता येईल. तांत्रिक अडचणी किंवा खात्याशी संबंधित इतर शंकांचे निरसन करण्यासाठी हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!