जिल्हा न्यायालयात वृक्षारोपनाने पर्यावरण दिन साजरा


दैनिक स्थैर्य । 13 जून 2025। सातारा । प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा श्रीमती. सुरेखा कोसमकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व बालन्यायमंडळ, सातारा तसेच जिल्हा वकील संघ, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दि. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुरेखा कोसमकर, जिल्हा न्यायाधीश-1 एस.आर. तांबोळी, दिवाणी न्यायाधीश व. स्तर व्ही. पी. पाटील, 4 थे सह. दिवाणी न्यायाधीश व. स्तर, आर. आर. मावतवाल, प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा तथा 6 वे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, सातारा जी. बी. नंदागवळे तसेच 8 वे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, सातारा एम. एम. बावरे , प्रमुख न्यायदंडाधिकारी, बालन्यायमंडळ, सातारा व सर्व न्यायिक अधिकारी एच. वाय. कावले, तसेच जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विकास पाटील व सर्व विधिज्ञ, तनिष्क वकील संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत विविध प्रकारची फळझाडे लावण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!