उद्योजक, ज्योतिष अभ्यासक दीपक चिपलकट्टी यांना ग्रहांकित ग्रहांकित जीवन गौरव पुरस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि. २१ ; सातारा येथील ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक आणि उद्योजक दीपक चिपलकट्टी यांना अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात दिला जाणारा ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार सातारा येथे ज्येष्ठ ज्योतिष तज्ञ प्राचार्य रमणलाल शहा यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

पुणे येथील ज्येष्ठ रमलंतज्ञ चंद्रकांत शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भालचंद्र ज्योतिर् विद्यालय पुणे व सातारा येथील प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष ऍकॅडमीच्या वतीने आयोजित अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ व कंदी पेढे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. दृक-श्राव्य माध्यमातून हा पुरस्कार पुणे येथे सुरू असलेल्या ज्योतिष अधिवेशनातच संपन्न झाला. याप्रसंगी या भालचंद्र ज्योतिष विद्यालयाचे कार्यकारिणी सदस्य ॲड .नारायण फडके ,प्राचार्य रमणलाल शहा, ज्योतिष अभ्यासक रमण वेलणकर ,श्री .कोळी तसेच सौ . मनाली चिपलकट्टी, सौ .रजनी वेलणकर सौ .शुभदा फडके यांची उपस्थिती होती.

सत्कार प्रसंगी बोलताना प्राचार्य रमणलाल शहा म्हणाले की, दीपक चिपलकट्टी यांनी गेली अनेक वर्षे आपला व्यवसाय सांभाळत ज्योतिषाचा अभ्यास करून अनेक गरजूंना मार्गदर्शन केले. ज्योतिष हे शास्त्र जीवनात अति मोलाची कामगिरी बजावत असून त्यातून जगण्यासाठीची पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचे काम चिपलकट्टी यांनी केले. ज्योतिष अभ्यास असाच त्यांनी पुढे सुरू ठेवावा त्यांच्या या वाटचालीला मी शुभेच्छा देतो.

सत्काराला उत्तर देताना दिपक चिपलकट्टी यांनी अनेक ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या अभ्यासातून ह्या ज्योतिषशास्त्राचा  अभ्यास करण्याची संधी लाभली. हे काम नसून आवडीने मी यात रममाण झालो आज मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी मोठा आनंद देणारा आहे आपल्या सर्वांच्या सदिच्छेने मी हे अभ्यास व शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमण वेलणकर यांनी केले. आभार नारायण फडके यांनी मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!