दैनिक स्थैर्य । दि. 11 ऑक्टोबर 2021 । फलटण । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार प्रदीर्घ दीड वर्षानंतर पुन्हा एकदा 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू झाल्या आणि पुन्हा एकदा चिमणी पाखरे शाळेत हजर झाली त्यांचे स्वागत जिल्हा परिषद शाळा वाठार निंबाळकर येथे फुलांच्या पायघड्या आणि औक्षण करून करण्यात आली आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने शाळा सुरू झाली.
या निमित्त विद्यार्थी आणि शिक्षक यांचे स्वागत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी वाठार निंबाळकर गावच्या सरपंच सौ शारदादेवी भोईटे तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, वाठार निंबाळकर गावचे पोलीस पाटील दत्तात्रय ढोक हे उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन जाधव सदस्य यांनी यावेळी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक कृष्णात कुंभार, संजय कचरे, सौ. छाया भोसले, अरविंद भोसले, श्रीमंत आवारे, कु. प्रमिला निंबाळकर, श्रीमती उषा सुतार या सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण (डायटच्या) प्राचार्या ज्योती मेटे यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला व कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम याविषयी आढावा घेऊन शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यांचे समवेत डायटचे अधिव्याख्याते नरळे, बीआरसीच्या विषय साधन व्यक्ती सौ.दमयंती कुंभार उपस्थित होत्या.