दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२४ | फलटण |
दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानची प्रबोधनाची चळवळ, सामाजिक उपक्रमातील सातत्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.
दुधेबावी, ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी समीर शेख बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
समीर शेख म्हणाले, सामाजिक प्रबोधन ही काळाची गरज असून परिसरातील प्रशासकीय अधिकार्यांचे सहकार्य, मार्गदर्शन घेतल्यास सामाजिक कार्यास गती येईल, असे त्यांनी निदर्शनास आणले. दुधेबावी प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमास सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी प्रास्ताविकात सातत्यपूर्ण २३ वर्ष राबवित असणारी संत गाडगेबाबा व्याख्यानमाला, मोफत आरोग्य शिबिरे, वाचनालय याबाबत माहिती विशद केली.
यावेळी जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे, व्हाईस चेअरमन विजय बनसोडे, संचालक तानाजी कुंभार, विक्रम डोंगरे, पत्रकार ज्ञानेश्वर भोईटे, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघांचे अध्यक्ष सुभाष सोनवलकर, प्रा. लक्ष्मण एकळ, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, कार्याध्यक्ष संतोष भांड, प्रा. महेंद्र एकळ, सचिव विठ्ठल सोनवलकर, खजिनदार डॉ. युवराज एकळ, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर, सचिन काळे, राहुल नाळे, वनपाल चंद्रकांत गेजगे, संचालक भानुदास सोनवलकर, राजेंद्र नाळे, ज्ञानेश्वर सोनवलकर, संतोष मोरे, शेखर चांगण, सुमित नाळे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन संत गाडगेबाबा व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले. स्वागत सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे यांनी आभार मानले.
यावेळी दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.