दैनिक स्थैर्य | दि. २१ जानेवारी २०२५ | मुंबई |
राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे दिसते. तसेच यासंदर्भात सर्व जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणांची यादी ३१ जानेवारीपर्यंत सरकारने जिल्हाधिकार्यांकडून मागवली आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मे या कालावधीत टप्प्याटप्प्याने गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हतावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीची देखहील नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात केंद्र संरक्षित ४७ किल्ले आहेत आणि राज्य संरक्षित ६२ किल्ले आहेत. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशाळगडाप्रमाणे राज्यातील अनेक गड किल्ले देखील अतिक्रमित असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अशी प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.