कराड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । सातारा । कराड शहर, कराड तालुका व उंब्रज या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया 4 ऑगस्ट 2022 रोजी व मतमोजणी प्रक्रिया 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेचा बंदोबस्त कामी नेमलेल्या उप विभागीय पोलीस  अधिकारी कराड, पोलीस निरीक्षक कराड शहर, कराड तालुका सहायक पोलीस निरीक्षक उंब्रज व पोलीस उपनिरीक्षक कराड शहर यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य पोलीस अधिकारी, अंमलदार यांना दि.4 ते 5 ऑगस्ट  2022 त्या-त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमना संदर्भात, मिरवणुकीच्या मार्गासंबंधाने, मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याच्या अधिकार प्रदान केले आहेत.


Back to top button
Don`t copy text!