महिला अत्याचाराविरोधात काँग्रेसचा आज चैत्यभूमीवर एल्गार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.४: भाजपा सरकारच्या
कार्यकाळात महिला व समाजाचे लोक सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्यावरील
अत्याचारात मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी भाजपा सरकारे
त्यांना पाठीशी घालत आहेत. या अत्याचाराविरोधात काँग्रेसने आवाज उठवला
असून बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी महिला व समाजावरील अत्याचार विरोधी दिवस
पाळला जाणार आहे. दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे
अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार
आहे.

भाजपच्या अन्यायी व अत्याचारी
सरकारांविरोधात चैत्यभूमीवर बुधवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत धरणे
आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई
काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली
होणा-या या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार,
पदाधिकारी सहभागी होणार आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!