
दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । माण । अवैध गौण खनिज बाबत माण तालुका सध्या चर्चेत असून माण मध्ये आलेले परिविक्षाधिन तहसिलदार श्री रिचर्ड यानथन (भा.प्र.से) यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनाधिकृत स्टोन क्रशरवर धडक कारवाई करणेत आली असून व्यवसायासाठी लागणारी वाहनेही जप्त केली आहेत.सातारा जिल्ह्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी असणाऱ्या या कारवाईमुळे लाखो रुपयांचा दंडाची रक्कम वसूल होणार आहे.
या कारवाई बद्दल परिविक्षाधीन तहसीलदार श्री रिचर्ड यानथन यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले ,शनिवार दिनांक ०५/०३/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजलेपासून क्रशरची पाहणी केल्यानंतर अधिकृत परवान्याबाबत संबंधित क्रशरधारक यांचेकडे विचारणा केली. त्यावर ब-याच क्रशरधारक यांनी क्रशरची मंजूरी अंतिम टप्यात असलेचे सांगितले.तसेच काही क्रशर धारकांनी तात्पुरते परवाने घेवून सदरचे क्रशर सुरु असलेबाबत सांगितले. आज रोजी तात्पुरते परवाने दिलेले आहेत किंवा कसे याबाबत विचारणा केली असता संबधितांनी नाही असे सांगितले.यावर क्रशर मंडलातील मंडलाधिकारी आणि तलाठी यांना सदरचे अनाधिकृत क्रशर तात्काळ सिल करणेबाबत सांगितले.त्या ठिकाणी असणारी इतर वाहने जागेवरच सिझ करणेबाबाबत सांगून त्या ठिकाणी आढळून आलेली खडी क्रश सॅण्ड यांचा पंचनामा आणि अहवाल तयार करुन तात्काळ सादर करणेच्या सूचना संबंधितांना जागेवरतीच दिल्या.दरम्यान सुरेश नारायण भोसले यांचे किरकसाल खाणपटयावर एक ट्रॅक्टर आणि एक पोकलॅन मशिन आढळून आले.सदरचा ट्रॅक्टर हा तहसिल कार्यालय माण येथे आणून जमा करणेत आला आणि पोकलॅन मशिन जागेवरतीच सिझ करण्यात आले.तसेच श्री राजेंद्र पांडूरंग फडतरे इंजबाब यांचे क्रशरवर असनाऱ्या नादुरुस्त ट्रॅक्टरची हवा सोडून देण्यात आली. परिविक्षाधिन तहसिलदार श्री रिचर्ड यानधन निवासी नायब तहसिलदार श्री श्रीशैल्य वट्टे, महसूल सहायक श्री युवराज खाडे यांचे पथकाने माण तालुक्यातील एकूण ११ अनाधिकृत खड़ी क्रशर सिल केले. सदर मोहिमेत मंडलाधिकारी गोंदवले, कुकुडवाड, मार्डी, म्हसवड, यांचेसह त्यांचे सजातील तलाठी यांनी सहभाग घेतला.
१) अनाधिकृत स्टोन क्रशरला विज पुरवठा करणा-या विज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री पोळ दहिवडी मंडल, आणि म्हसवड मंडलाचे कनिष्ठ अभियंता श्री तायडे यांना सदरच्या अनाधिकृत क्रशरला विजजोडणी देण्यात आलेली आहे ती तात्काळ खंडीत करणेबाबत सूचना देण्यात आल्या
२) तसेच अनाधिकृत वाळू वाहतूक आणि उत्खननावर यापुढे कठोर कारवाई करणार असलेचे नमूद केले आहे. त्यामुळे माण तालुक्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाई केलेल्या खडी क्रशर मालकांची नावे
१) सौ. सुनिता कट्टे गोंदवले , २) दत्तु कट्टे गोंदवले, ३) बबन विरकर धुळदेव , ४) श्री. विवेक कट्टे गोंदवले , ५) श्री. सुरेश भोसले , ६) श्री. विनोद शेडगे गोंदवले खु. , ७) श्री. निवृत्ती फडतरे गोंदवले ख, ८) श्री. निलेश गायकवाड धामणी , ९) श्री. राजेंद्र फडतरे , इंजबाव , १० ) श्री रणजित शिंदे जाशी , ११) श्री. धनाजी दोलताडे रांजणी