प्रतापगड कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर : 13 मार्च रोजी होणार मतदान


दैनिक स्थैर्य । दि.०८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 13 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर दि. 14 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रतापगड कारखाना लि. सोनगाव करंदोशी या संस्थेची अधिसूचना जारी केली आहे. या ठिकाणी संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात व्यक्ती व ऊस सभासद गटातून 15 जागा आहेत.

यामध्ये गट नं. 1 कुडाळ, गट नं. 2 खर्शी सायगांव, गट नं. 3 हुमगाव, गट नं. 4 मेढा, गट नं. 5 महाबळेश्वर या 5 गटातून संचालकांच्या प्रत्येकी 3 जागा आहेत. तसेच उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था 1, महिला राखीव 2, अनु. जाती व जमाती राखीव 1, विमुक्त जाती व भटक्या जमाती राखीव १, इतर मागास प्रवर्ग १ अशा २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!