अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलटण शाखा पदाधिकार्‍यांच्या निवडी; कार्यकारिणी अध्यक्षपदी डॉ. दीपक शेंडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ मे २०२३ | फलटण |

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलटण शाखेच्या कार्यकर्त्यांची सभा दि. ९ रोजी प्रसाद शिंगाडे यांच्या निवासस्थानी पार पडली. या सभेला राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार आणि भगवान रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.
प्रारंभी मंदाकिनी गायकवाड यांनी फलटण शाखेच्या गेल्या सहा महिन्यांतील कामकाजाची माहिती दिली.

यावेळी फलटण शाखा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी डॉ. दीपक शेंडे यांची आणि उपाध्यक्ष तसेच वार्तापत्र व प्रकाशन विभाग कार्यवाहपदी आत्माराम बोराटे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी मंदाकिनी गायकवाड यांची तर प्रधान सचिव व महिला विभाग कार्यवाहपदी मोहिनी भोंगळे यांची निवड करण्यात आली.

बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाहपदी आनंद देशमुख, जात निर्मूलन व विवेकी जोडीदार निवड विभाग कार्यवाह व वार्तापत्र व प्रकाशन विभाग कार्यवाहपदी गोपाळ सरक, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग व सोशल मीडिया विभाग कार्यवाहपदी अभिजित रणवरे, विविध उपक्रम व सांस्कृतिक विभाग कार्यवाहपदी प्रसाद शिंगाडे, मानसिक आरोग्य विभाग कार्यवाहपदी सचिन काकडे, युवा व विवेकवाहिनी विभाग कार्यवाहपदी गणेश भोंगळे, प्रशिक्षण विभाग कार्यवाहपदी श्री. बोबडे यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी राज्य बुवाबाजी संघर्ष विभाग सदस्य भगवान रणदिवे यांनी विज्ञानवादी गीताचे गायन केले. या सभेला अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!