प्राथमिक शिक्षक समितीच्या फलटण तालुकाध्यक्षपदी नीलेश कर्वे, सरचिटणीसपदी संतोष कोळेकर यांची निवड


दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२३ | फलटण |
फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुकास्तरीय कार्यकारणीच्या निवडीसाठी नुकतेच विशेष अधिवेशन झाले. त्यामध्ये नूतन कार्यकारणी निवडण्यात आली असून यामध्ये फलटण तालुकाध्यक्षपदी श्री. निलेश कर्वे, तालुका सरचिटणीसपदी श्री. संतोष कोळेकर, कार्याध्यक्ष श्री. संजय देशमुख सर, कोषाध्यक्ष श्री. प्रशांत खताळ, उपाध्यक्ष श्री. विक्रम घाडगे, उपाध्यक्ष श्री. दत्ता शिंदे, प्रसिद्धी प्रमुख संदीप भोसले, विभागीय उपाध्यक्ष श्री. किशोर तळेकर, सहसचिव किरण बोबडे, संघटक परमेश्वर कांबळे यांसह शिक्षक नेते संभाजी बिटले, तालुका नेतेपदी श्री. रामचंद्र बागल यांची निवड करण्यात आली आहे.

नवनियुक्त कार्यकारिणीचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते श्री. उदय शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विश्वंभर रणवरे, सातारा जिल्हा सरचिटणीस श्री. किरण यादव यांसह सर्व जिल्हास्तरीय पदाधिकारी व तालुकास्तरीय पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन करून नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्याला मिळालेल्या या संधीचे आपण निश्चितच सोने करून फलटण तालुक्यात शिक्षक समिती संघटन वाढवून सर्वसामान्य शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी अविरत कार्यरत राहू, असा आशावाद नवनियुक्त अध्यक्ष श्री. निलेश कर्वे व सरचिटणीस श्री. संतोष कोळेकर यांनी बोलून दाखवला आहे.


Back to top button
Don`t copy text!