दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२५ | फलटण |
टाकळवाडे (ता. फलटण) येथील जनाबाई ज्ञानदेव पवार (वय ७५ वर्षे) या वृध्द महिलेचे सुमारे ५,७५० रुपये किंमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता एसटीतून प्रवास करताना अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
जनाबाई पवार या फलटण एस.टी.स्टॅन्ड ते श्रीराम साखर कारखाना, ता. फलटणदरम्यान एसटी बसमधून राजाळे येथे जात होत्या.
या चोरीचा तपास म.पो.हवा. पूनम वाघ करत आहेत.