राज्यात तपोवनसह आठ रेल्वे 11 ऑक्टोबरपासून धावणार, मुंबई-लातूर सुपरफास्ट आठवड्यातून 4 दिवस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मनमाड, दि ९: येत्या ११ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील आठ विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यात मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस व कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस या दररोज धावणाऱ्या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे.

– या गाड्या : मुंबई-लातूर सुपरफास्ट आठवड्यातून ४ दिवस, अजनी-पुणे, पुणे-अमरावती, पुणे-नागपूर आठवड्यातून एकदा धावेल. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. – नियम : कोविड -19 अंतर्गत अनलॉकचे सर्व नियम लागू असतील. फक्त आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येईल. – रिझर्व्हेशन : ८ ऑक्टोबरपासून सर्व रिझर्व्हेशन केंद्रे तसेच आयआरसीटीसी वेबसाइटवरून आरक्षण सुरू झाले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!