स्थैर्य, विडणी, दि. १० : विडणी येथील मोटार रिव्हायडींग व्यक्तीच्या संपर्कातील हायरिस्क मधील नऊ पैकी आठ जणांंचा अहवाल पॉझेटिव्ह आल्याने विडणीत पहिला बाधीत धरुन एकूण नऊ व्यक्ती बाधीत सापडल्याने विडणीत पहील्यांदाच एवढा मोठा कोरोनाचा धमाका झाल्याने गावात सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना करणेत आला आहे.
विडणी येथील एका युवकाला सर्दी, खोकला तसेच इतर त्रास जाणवू लागल्याने त्याने अलगुडेवाडी येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले मात्र त्रास कमी न झाल्याने त्यांनी फलटण येथे उपचार घेतला मात्र तेथील डॉक्टरांना कोरोनाचा संशय आल्याने त्यांनी त्या युवकाला सातारा येथे पाठवले असता त्याचे दोन दिवसांपूर्वी स्वॅब घेण्यात आले होते.
सोमवारी दि.३ अॉगष्ट रोजी युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या युवकाच्या संपर्कातील व कुटूबांतील असे एकूण नऊ जणांना हायरिस्क मध्ये फलटण येथील शेतीशाळा येथे क्वांरंटाईन करण्यात आले होते.या सर्वांचे शनिवारी दि.८ अॉगस्ट रोजी स्वँब घेण्यात आले होते त्यांचा रिपोर्ट रविवारी दि.९ अॉगस्ट रोजी राञी उशिरा प्राप्त झाला असून यामध्ये एक व्यक्ती सोडता घरातील आठ व्यक्तीचे अहवाल पॉझेटिव्ह आल्याने विडणीतील एकूण नऊ जण कोरोना बाधित सापडण्याची पहीलीच वेळ असल्याने गांवात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.युवकाची संपूर्ण वस्ती व परिसर सील करण्यात आली आहे ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात हायड्रोक्लोराईडची फवारणी करणेत आली आहे.तसेच बाधित व्यक्तीच्या परिसरातील कंटेन्टमेन झोन मधील लोकांनी बाहेर फिरु नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करणेत आले असून जर तसा व्यक्ती बाहेर फिरताना सापडल्यास संबंधितावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बाधीत व्यक्तीच्या वस्तीवरील ७० वर्षीय व्यक्तीचा राञी मृत्यू झाला असून प्रशासनाने त्यास कोरोना बाधीत धरल्याने लोरिस्क मधील तेरा जणांची रँपिड टेस्ट राजाळे उपकेद्रात घेण्यात येणार असून दोन दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होईल. संबधित मयत व्यक्तीवर फलटण नगरपालिकेने बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसस्कार करणेत आले.