कराड तालुक्यातील म्हासोली येथील आठ बाधित कोरोनामुक्त : आज सोडले घरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 28 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या कराड तालुक्यातील म्हासोली येथील 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

म्हासोली ता. कराड येथील 16, 17 व 18 वर्षीय युवक, 45, 50 व 62 वर्षीय पुरुष तसेच 35 व 48 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. या आठ रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या आठ  जणांना आज घरी  सोडण्यात आले.

आत्तापर्यंत जिल्ह्यात 422 कोरोना बाधित आढळले असून त्यापैकी 134  जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!