लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांच्या कृती आराखड्यासाठी प्रयत्नशील – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । जळगाव । लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांचा कृती आराखडा बदलण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच कोविड-१९ मध्ये जीव गमावलेल्या विविध पालिका कर्मचाऱ्यांना शासनातर्फे न्याय देण्याबाबत निर्णय घेऊ. असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज पाचोरा येथे केले.

पाचोरा नगरपरिषदे अंतर्गत विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त आयोजित पाचोरा येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील वाढते नागरीकरण व शहरांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी सध्या लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांचे प्रमाण विसंगत असल्याने याबाबतचा कृती आराखडा बदलण्याबाबत नगरविकास विभागामार्फत सकारात्मक विचार करण्यात येईल.

मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, राज्यात वाढते नागरीकरण लक्षात घेऊन शहरांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. शहरांची स्वच्छता राहावी याकरिता सफाई कामगारांची संख्या वाढविणे आवश्यक आहे त्यामुळे याबाबतचा कृती आराखडा बदलण्याबाबत नगर विकासविभाग प्राधान्याने विचार करेल. लोकप्रतिनिधींच्या विकासात्मक दृष्टिकोनातून पाचोरा शहरात सुरू असलेली विविध विकास कामे व भविष्यात होणारी कामे लक्षात घेता मोठ्या शहरांना लाजवेल अशी विकासाची कामे पाचोरा शहरात होत आहे. या माध्यमातून पाचोरा शहराची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू असल्याचे दिसून येत आहे तसेच शहरातील विकास कामांसाठी पाचोरा नगर परिषदेमार्फत पाठविण्यात आलेल्या रस्त्यांसाठीच्या शंभर कोटी रुपयांच्या विकास प्रकल्प अहवालास लवकरात लवकर मंजुरी देण्यात येऊन या कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना विमाकवच देण्याबाबतही विचार करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाचोरा शहरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध लोकोपयोगी कामे प्रस्तावित करण्यात आली आहे त्यामुळे या शहराचा निश्चितच विकास होईल असे सांगून ते म्हणाले की, शहरातील मोकळ्या जागांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण होत असताना पाचोरा शहरातील मोकळ्या जागांचा विकास केला जात आहे ही निश्चितच विकासाची नांदी ठरेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा नगरपालिकेने केलेल्या विकासकामांची चित्रफीत पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यासह नगरपरिषदेच्या सर्व  लोकप्रतिनिधींचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सर्वश्री. किशोर आप्पा पाटील, चिमणराव पाटील  उदयसिंग राजपूत, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष संजय सावंत, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर,  माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सुनील पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल पाचोरा संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, उपनगराध्यक्ष प्रियंका पाटील, नगरसेवक, नगरसेविका आदि उपस्थित होते.

पाचोरा नगरपरिषदेतर्फे शहरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण आज राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सर्वश्री. किशोर आप्पा पाटील, चिमणराव पाटील, उदेसिंग राजपूत, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष संजय सावंत आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास नगराध्यक्ष संजय नाथालाल गोहील, उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील, मुख्याधिकारी श्रीमती.शोभा बाविस्कर आदींसह नगरपरिषदेतील विविध पक्षांचे गटनेते, स्थायी समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, नागरीक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते  नगरपरिषदेच्या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत माजी मंत्री के. एम. बापु पाटील व्यापारी संकुल बांधकामाचे उद्घाटन. पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील हिवरा नदीवर कृष्णापुरी जवळ पुलाचे भूमिपुजन, हिवरा नदीवर पंचाळेश्वर मंदिराजवळ पुलाचे भुमिपुजन, महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नविन इमारतीचे विद्युतीकरण तसेच फर्निचरसह बांधकामाचा लोकार्पण, विशेष रस्ता अनुदानतंर्गत हिवरा नदीवर स्मशानभुमीजवळील पुलाचे भूमिपुजन करण्यात आले.

त्याचबरोबर नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत वल्लभभाई पटेल रोड, एच.डी.एफ.सी. बॅकेपासून सम्राट अशोक नगरच्या गेट पावेतोच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचे भुमिपुजन, नगरपरीषद निधी अंतर्गत पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील प्रभाग क्रं. 1 मधील साई प्रोव्हिजन, श्री. एन आर ठाकरे यांचे घरापासुन गो से हायस्कुल पावेतोच्या रस्त्याचे कांक्रिटीकरण करणे, प्रभाग क्र. 1 मधील साई प्रोव्हिजन, श्री. एन आर ठाकरे यांचे घरापासुन गो से हायस्कुल पावेतोच्या रस्त्याचे दोन्ही बाजुस आर सी सी गटार बांधकाम करणे. शिवाजी चौकापासून कृष्णापुरी चौफुली पावेतोच्या रस्त्याचे कांक्रिटीकरण व गटार कामे करणे, मानसिंगका कॉर्नरपासून जारगांव चौफुली पावेतोच्या रस्त्याचे रुंदीकरणासह कांक्रिटीकरण करणे, शिवाजी चौकापासुन एस एस एम एम कॉलेज पावेतोच्या रस्त्याचे रुंदीकरणासह काक्रिटीकरण करणे. त्याचबरोबर खुल्या जागा विकसीत करणेतंर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेतंर्गत प्रभाग क्र. 7 सर्वे क्रं. 57/1, संघवी कॉलनी मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचे लोकार्पण, प्रभाग क्र. 9 एम.आय.डी.सी.कॉलनी मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचे लोकार्पण, प्रभाग क्र. 8 सर्वे क्र. 86/2 आशिर्वाद कॉटेज मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचेही लोकार्पण करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!