
दैनिक स्थैर्य । 15 जून 2025 । फलटण । बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी विधान परिषदेचे सभापती सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सासवड (ता. फलटण) येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल शिवाजीराव रासकर यांनी विद्यार्थ्यांसाठी तसेच फरांदवाडी गावातील काही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच पांडुरंग जाधव, युवा नेते नंदकुमार झणझणे, दीपक जाधव, नवनाथ जगताप तसेच फरांदवाडी येथील अनिल दळवे, ग्रामपंचायत सदस्य समोल नाळे, ग्रामपंचायत सदस्य सौ. कविता राऊत, संतोष राऊत, विजय नाळे, गणेश दळवे, नवनाथ राऊत, हेमंत राऊत, अक्षय बोराटे, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.