ईडी आणि ‘एनआयए’ची मुंबईत छापेमारी; १० ठिकाणांवर धाडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईतील एका व्यक्तीविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई सुरु केली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून मंगळवारी सकाळी सक्तवसुली संचलनालयाकडून मुंबईतील १० ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही व्यक्ती कोण आणि ईडीने नक्की कोणत्या मालमत्तांवर छापे टाकले आहेत, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. परंतु, कारवाईच्या फेऱ्यात आलेल्या व्यक्तीचे दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी राष्ट्रीय तपासयंत्रणेने गेल्या आठवड्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडी आणि एनआयएकडून संबंधित व्यक्तीच्या मालमत्तांवर छापे टाकले जात आहेत. त्यामुळे आता या सगळ्यातून केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यहार प्रकरणात महाराष्ट्रातील एक राजकीय नेता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे. ईडीने दाऊदची बहीण हसीन पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापेमारी केल्याचे समजते. दुबईला पळून गेलेल्या दाऊदचे मुंबईत अनेक व्यवसाय आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये डी कंपनीचा सहभाग आढळून आला होता. काही दिवसांपूर्वीच भारतीय तपास यंत्रणांनी १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबु बाकर याला युएईमधून ताब्यात घेतले होते.


Back to top button
Don`t copy text!