आर्थिक व सामाजिक सुरक्षितता महत्त्वाची – राजेंद्र कोंढरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२४ | बारामती |
जग डिजिटल होत असताना मराठा समाजाने लग्नसमारंभ यावर उधळपट्टी करू नये, जमीन रेकॉर्ड व्यवस्थित ठेवावे, शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, आर्थिक व सामाजिक साक्षरता महत्वाची असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले.

रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग जगताप, बारामती तालुकाध्यक्ष संभाजी माने, शहर अध्यक्ष हेमंत नवसारे, युवक अध्यक्ष गणेश काळे, तालुका महिला अध्यक्ष अ‍ॅड. सुप्रिया बर्गे, महिला शहर अध्यक्ष अर्चना सातव व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मराठा समाजासाठी शासनाच्या विविध योजना, नियम अटी, जगण्याची आदर्श आचारसंहिता विविध विषयांवर पुस्तकाचे प्रकाशन दि. १९ फेब्रुवारी रोजी होणार असून त्याचे वितरण करण्याचे आवाहन राजेंद्र कोंढरे यांनी केले.

यावेळी पदाधिकारी नियुक्तीपत्रे देण्यात आली. आभार अ‍ॅड. वीणाताई फडतरे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!