खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून फलटण तालुक्यातील विविध विकासकामांकरीता ५ कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाच्या सन २०२२-२३ ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या निधीतून विविध विकास कामांकरीता ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मंजूर विकासकामे अशी : उपळवे (सावंतवाडी), ता.फलटण, जि.सातारा येथे व्यायामशाळा (क्रीडा संकुलन) बांधणे – १ कोटी, कांबळेश्वर, ता.फलटण, जि.सातारा येथे कांबळेश्वर ते कवडीचा मळा रस्ता करणे – १५ लक्ष, कांबळेश्वर, ता.फलटण येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटकरण करणे – १० लक्ष, कुरवली बु., ता. फलटण येथे निंबाळकर बंगला (बाणगंगा धरणाजवळून) ते दालवडी रस्ता करणे – ७० लक्ष, झडकबाईचीवाडी, ता. फलटण येथे शिंदेमाळ ते तरडफ ग्रा.मा २२६ रस्ता कॉक्रीटीकरण करणे – १० लक्ष, तांबवे, ता.फलटण येथे मोहन शिंदे ते संतोष शिंदे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे – १० लक्ष, दयाचीवाडी, ता. फलटण येथे कुमकाले वस्ती ते दर्याचीवाडी गाव रस्ता सिमेंट काँक्रीटकरण करणे – १० लक्ष, धुमाळवाडी, ता.फलटण येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटकरण करणे – १० लक्ष, पिंपळवाडी, ता. फलटण येथे गणेश मंदिर ते विठ्ठल मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीटकरण करणे – १० लक्ष, भाडळी खु. ता. फलटण येथे डूबल वस्ती ते तिरकवाडी रस्ता सिमेंट काँक्रीटकरण करणे – १५ लक्ष, मानेवाडी, ता.फलटण येथे अंतर्गत रस्ते सिमेंट कॉक्रीटकरण करणे – १५ लक्ष, राजाळे, ता.फलटण येथे गावठाण ते २६ चारी पर्यंत रस्ता करणे – १० लक्ष, राजाळे ता. फलटण येथे २६ फाटा ते ठेंगील वस्ती रस्ता सिमेंट कॉक्रीटकरण करणे – १० लक्ष, राजाळे, ता. फलटण येथे स्मशानभूमी बांधणे- ५ लक्ष, वाखरी, ता.फलटण येथे स्मशानभूमी बैठक व्यवस्था विधी कट्टा रोड बांधणे – १० लक्ष, विचुर्णी, ता.फलटण येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटकरण करणे- १० लक्ष, विडणी, ता.फलटण येथे दंडिले मळा ते राउतवाडी रस्ता सिमेंट काँक्रीटकरण करणे – १५ लक्ष, विडणी, ता. फलटण येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटकरण करणे – १० लक्ष, शेरेचीवाडी (हि) ता. फलटण येथे प्रभाकर चव्हाण ते बबन गोप्णार घर रस्ता सिमेंट काँक्रीटकरण करणे – ५ लक्ष, शेरेचीवाडी (हि), ता. फलटण येथे शामराव जाधव से महालक्ष्मी मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे – ५ लक्ष, शेरेचीवाडी (हि), ता. फलटण येथे शिंदेवस्ती ते चांभारवाडी रस्ता सिमेंट कॉक्रीटकरण करणे – १० लक्ष, सस्तेवाडी, ता. फलटण येथे अरुण चव्हाण घर ते सस्तेवाडी हायस्कूल सिमेंट काँक्रीटकरण करणे – १० लक्ष, साखरवाडी, तालुका फलटण येथे बाजार पेठ रस्ते करणे १५ लक्ष, सालपे, तालुका फलटण येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे १० लक्ष, सावंतवाडा, तालुका फलटण येथे वाघजाई मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे १० लक्ष, सुरवडी, ता. फलटण येथे अंतर्गत बंदिस्त गटारे तयार करणे २० लक्ष, सुरवडी, ता. फलटण येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करणे २० लक्ष, सोनवडी बु., ता. फलटण येथे स्मशानभूमी नवीन बांधणे १० लक्ष, फरांदवाडी, ता. फलटण येथे पराग पीवसी फक्टरी ते नांदल रस्ता सिमेंट काँक्रीट करणे १० लक्ष, फरांदवाडी, ता. फलटण येथे वडजल फरांदवासी शिव रस्ता सिमेंट काँक्रीट करणे १० लक्ष, मठाचीवाडी, ता. फलटण येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करणे १० लक्ष, गुणवरे ता. फलटण जि. सातारा येथे अंतर्गत रस्ते सिमेंट कॉक्रीट करणे १० लक्ष, असे एकूण रक्कम ५ कोटी रुपयांच्या विकासकामांची मंजुरी मिळाली आहे.

बरेच वर्षापासून फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील व तालुक्यात येणारे प्रमुख रस्ते खिळखिळीत झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर तात्पुरती दुरूस्ती करण्यात येत होती; परंतु पुन्हा रस्त्याची अवस्था पूर्वीसारखी होत होती. याबाबत खासदार रणजितसिंह.ना.निंबाळकर यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या आणि याबाबत २०२२- २३ ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या निधीतून फलटण तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी आणली. मतदारसंघातील विकासकामे मंजूर करण्यासाठी खासदार निंबाळकर यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.


Back to top button
Don`t copy text!