सासकल येथे खा. रणजितसिंह यांच्या प्रचारार्थ जिजामाला नाईक निंबाळकर यांचा जनसंपर्क दौरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ एप्रिल २०२४ | फलटण |
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर या फलटण तालुक्यातील विविध गावांमध्ये जनसंपर्क दौर्‍यावर असून नुकताच त्यांनी सासकल (ता. फलटण) येथे जनसंवाद दौर्‍यादरम्यान कार्यकर्त्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले यांची भेट घेऊन गावच्या समस्या जाणून घेतल्या. गावकर्‍यांशी संवाद साधत असताना गावातील मुख्य समस्या, शेतकर्‍यांचे, तरुणांचे प्रश्न, रस्त्यांच्या समस्या, गायरानातील लोकवस्तीची समस्या, मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणार्‍या वर्गखोल्यांची समस्या जाणून घेतली. एस. टी. बस सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आश्वासन दिले.

यावेळी शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असणार्‍या सेवासुविधांसंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक घोरपडे यांनी शाळेच्या समस्या मांडल्या.

याप्रसंगी सासकल गावचे उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य हणमंतराव मुळीक, राष्ट्रीय समाज पक्षाच्या संगीता मुळीक, शिवाजी मुळीक, सर्जेराव मुळीक, ज्ञानेश्वर मुळीक, अस्मिता मुळीक, अजित मुळीक, मंगेश मुळीक, सागर मुळीक, चेतन मुळीक, सचिन फडतरे, सचिन मुळीक, संपत मुळीक, ज्ञानेश्वर नरसिंग मुळीक, संदीप फडतरे, हणमंत फडतरे, देविदास चांगण, हरिभाऊ मुळीक, गोपीनाथ डांगे, भीमराव खुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!