ईझमायट्रिप तीन प्रवास कंपन्यांच्या अधिग्रहणासाठी सज्ज

गाइडलाइन ग्रुप, ट्रिपशोप ऑनलाइन आणि डूक ट्रॅव्हल्सचा समावेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२३ । मुंबई । भारतातील सर्वांत मोठा ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म ईझमायट्रिपडॉटकॉम ने भारतात समाविष्ट तीन ठळक प्रवास कंपन्यांच्या अधिग्रहणासाठी बोर्डाने मंजूरी दिल्याची घोषणा केली आहे. या कंपन्यांचा एकत्रित पेड-अप समभाग भांडवलाच्या ५१ टक्के भागभांडवल ईझमायट्रिपद्वारे संपादित केले जाणार आहे. कंपनी अधिग्रहण करणार असलेल्या निवडक कंपन्यांमध्ये गाइडलाइन ट्रॅव्हल्स हॉलिडेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई; ट्रिपशोप ट्रॅव्हल्स टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, जम्मू व काश्मीर; डूक ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली या प्रमुख तीन कंपन्यांचा समावेश आहे. प्रवास व पर्यटनाच्या क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून आपले स्थान भक्कम करण्यासाठी कंपनी ही अधिग्रहणे करत आहे.

संबंधित कंपन्यांमधील समभाग विकणाऱ्या समभागधारकांना आपले इक्विटी समभाग प्राधान्य तत्त्वाने जारी करून, ईझमायट्रिप, या प्रस्तावित अधिग्रहणांचा मोबदला देणार आहे. ईझमायट्रिप हा प्लॅटफॉर्म सर्वार्थाने भारतातील पसंतीच्या प्रवास सहयोगींपैकी एक आहे आणि जारातील अस्तित्व ठळक करण्यासाठी कंपनी सक्रियपणे अन्य कंपन्यांचे अधिग्रहण करून विस्तार साधत आहे.

ईझमायट्रिपचे सह-संस्थापक श्री. निशांत पिट्टी या अधिग्रहणांबद्दल म्हणाले, “या तिन्ही कंपन्यांची कामगिरी उत्तम आहे आणि त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रांमधील गाढ अनुभव आहे. या लक्षणीय ट्रॅव्हल कंपन्यांच्या साथीने आम्ही अधिक मोठ्या बाजारपेठांना दिल्या जाणाऱ्या विस्तृत सेवांच्या क्षेत्रात विस्तार करू शकू. असंख्य शोधकांची चौकसबुद्धी जागवण्यासाठी, प्रत्येकाला आपलासा वाटणारा अविस्मरणीय प्रवास घडवण्यासाठी आणि शोध व साहसाच्या रंगांनी जग रंगवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे सज्ज आहोत.’’


Back to top button
Don`t copy text!