
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 23 : प्रतापगंज पेठेत ऐक्य प्रेस काॅनॆर जवळ पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या टेम्पोला आग लागल्याची घटना घडली. याची माहिती नागरिकांनी लगेचच पालिकेच्या अग्निशमन दलाला देताच तत्काळ अग्निशमन दलाचा बंब पोहचला अन पेटलेला टेम्पोची आग आटोक्यात आणली.
प्रतापगंज पेठेत काही मंडप व्यवसाय करणारे आहेत.त्यांचे साहित्य आणि वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात.पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास टेम्पोला अचानक आग लागली. आगीत टेम्पोतील मंडपाचे साहित्य असल्याने लगेच पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. सातारा पालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी सौरभ साळुंखे यांच्यासह पथक दाखल झाले अन पेटलेल्या टेम्पोची आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती.
