ई – पीक पाहणी व्हर्जन २ या ऍपवर रजिस्ट्रेशन करावे : तहसीलदार समीर यादव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । फलटण । महसुल विभागाने ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी संपुर्ण राज्यात करणेबाबत निर्देश देणेत आलेले आहेत. ई-पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत शेतक-यांनी आपले मोबाईल मध्ये ई-पीक पाहणी व्हर्जन २ हे अॅप डाऊनलोड करुन रजिस्ट्रेशन करावे व आपल्या मालकीच्या शेतजमिनीची पीक पहाणी स्वतः अॅपवर नोंदवावयाची आहे. तसेच पिकांचे फोटो अपलोड करावयाचे आहेत, अशी माहिती फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी दिली.

यामध्ये प्रथमतः शेतकर्यांना देय असणार्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच दुष्काळ, अतिवृष्टीने होणारे नुकसानीसाठी ही माहीती आवश्यक आहे. त्यानंतर खातेदार निहाय पीक पहाणीमुळे खातेदार निहाय पीक कर्ज अथवा पीक विमा योजना भरणे किंवा पीक नुकसान भरपाई अदा करणे शक्य होणार आहे. व नंतर कृषी विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणा-या योजना जसे ठिबक तुषार सिंचन योजना इत्यादीचे लाभ खातेधारकांना अचुकरित्या देणे सहज शक्य होणार आहे, असेही तहसीलदार समीर यादव यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!