साता-यात गुरुवारी सातारकरांच्यावतीने श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांना आदरांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । सातारा । शांत, संयमी, सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे आणि छत्रपती घराण्याचे बारावे वंशज श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांचे 13 सप्टेंबर रोजी अल्प आजाराने निधन झाले त्यामुळे सातारकरांवर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रात अखेरपर्यंत कार्यरत असणा-या श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांना सातारकरांच्यावतीने आदरांजली वाहण्यात येणार आहे. गुरुवार दि. 22 सप्टेंबर रोजी येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सायंकाळी 5.30 वाजता आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांचे भरीव योगदान होते. त्यांनी सलग सहा वर्षे शाहुनगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली आणि त्यांच्या काळात त्यांनी समाजोपयोगी विविध कामे केली. सातारच्या राजघराण्यातील दोन चुलत भावांमधील वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेविषयी अतिशय आपुलकी आणि प्रेम असणारे ते राजे होते. अशा या सर्वसामान्यांच्या लोकप्रिय राजांचे 13 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सातारच्या जनतेचे आणि राजघराण्याचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगलेल्या श्री.छ. शिवाजीराजेंना सर्व क्षेत्रातील सातारकरांच्यावतीने 22 सप्टेंबर रोजी आदरांजली वाहण्यात येणार आहे त्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिरीष चिटणीस, अमोल मोहिते, विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!