स्थैर्य, फलटण : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘श्रीमंत रामराजे हेल्पलाईन’च्या माध्यमातून हजारो लोकांना ई-पास द्वारे प्रवासाची परवानगी मिळवून देण्यात आलेली आहे. याबाबत अनेकांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.
कोव्हिड-19 या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण देशभर व आपल्या महाराष्ट्रामध्ये ही गेली तीन महिनेच्यावर झाले लाॅकडाउन सुरू असल्यामुळे फलटण तालुक्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील ज्या व्यक्ती अथवा कुटुंबे परजिल्ह्यामध्ये व परराज्यात मध्ये अडकून बसली होती. त्यांना पुन्हा आपल्या गावी यावयाचे असल्यामुळे त्यांना लाॅकडाउनमुळे येता येत नव्हते. त्यासाठी शासनाने काही नियम व निर्बंध घातले होते. ते नियम व निर्बंध सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नसल्यामुळे त्यांना परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून आपल्या मूळ गावी येता येत नव्हते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे काही लोकांनी आपल्या तक्रारी फोनद्वारे मांडल्या होत्या. त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे राज्य अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार ‘श्रीमंत रामराजे हेल्पलाइन’ या नावाचा एक हेल्पलाइन ग्रुप तयार करून त्या ग्रुपद्वारे परराज्यातून अथवा पर जिल्ह्यातून आपल्या गावी येणाऱ्या लोकांना अथवा आपल्या जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणाऱ्या लोकांना ई-पास प्राप्त करून देण्यासाठी मदत मिळवून देण्याचे काम ‘श्रीमंत रामराजे हेल्पलाइनच्या’ माध्यमातून गेली दोन महिने चालू आहे. आज अखेर या हेल्पलाइनच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना ई-पास काढून देण्यात आले आहेत. सदरचा ई-पास काढून देण्यासंबंधी ग्रुपच्या काही सदस्यांना अडचणी आल्या मात्र त्या सर्व अडचणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोडवून हे ई-पास प्राप्त करून घेण्यात आले आहेत.
त्यामुळे फलटण तालुक्यात अथवा सातारा जिल्ह्यात आपल्या मूळ गावी आलेल्या नागरिकांमध्ये आनंदाची, समाधानाची व सुरक्षिततेची भावना असून त्यांनी ‘श्रीमंत रामराजे हेल्पलाइनच्या’ या ग्रुपच्या सदस्यांना फोन करून अथवा मेसेज द्वारे आभार मानून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.